स्वच्छता निरीक्षक पदविका – हा अभ्यासक्रम आरोग्य विभागाशी संबंधित आहे.

सदर अभ्यासक्रमात सार्वजनीक आरोग्य, पर्यावरण आरोग्य, स्वच्छता आणि स्वच्छता पध्दती (Sanitation & hygiene Practices) या सारख्या क्षेत्रातील सैध्दांतीक आणि प्रॅक्टीकल ज्ञान प्रदान करतात. सामान्य संसर्गजन्य रोग आणि सुक्ष्मजिवशास्त्र ( Communicable diseases & Microbiology) कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट (Waste management & disposal) अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण (Food Safety & Quality Control) वॉटर सप्लाय क्वालीटी अँड पोल्युशन कन्ट्रोल, व्यवसायिक आरोग्य आणि सुरक्षा (Occupational Health & Safety), रोगांचा प्रादुर्भाव तपासणे (Investigates disease) इत्यादी विषयाचा समावेश होतो.

कोर्स कोणासाठी

  • करियर,जॉब,स्वंयरोजगारची संधी शोधणारे तरुण 

  • वैद्यकीय क्षेत्रात कार्य/सेवा देण्यासाठी

  • 10/12 वी पास विद्यार्थ्यांसाठी



कोर्स नंतर जॉब कुठे मिळेल?

सदर कोर्स आरोग्य सेवक व स्वच्छता निरीक्षक पदभरती पात्रता करिता अनिवार्य करण्यात आलेला आहे खालील सरकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर जागा उपलब्ध आहेत :- 

★ महानगरपालिका

★ नगरपालिका

★ जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्र (P.H.C.)

★ सार्वजनिक आरोग्य विभाग  

★ AIIMS institute 

★ रेल्वे भरती  

★ एअरपोर्ट 

★ कॅन्टोन्मेंट बोर्ड (डिफेन्स )

★आर्मी  

तसेच

* स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये व वैद्यकीय शिक्षण संस्था, रेल्वे व हवाई वाहतूक क्षेत्र, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध आहेत. ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे.

* निमसरकारी किंवा गैरसरकारी असणाऱ्या अनेक कार्यालयांमधील आरोग्य खाते किंवा स्वच्छता विभागात नोकरीची संधी मिळू शकते.

* महाविद्यालये, रुग्णालये यामध्येही चांगल्या संधी आहेत .

* ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत अनेक ठिकाणी उमेदवार काम करू शकतात.


स्वच्छता निरीक्षक कर्तव्य व जबाबदाऱ्या

  •   जेथे अन्न उत्पादित प्रक्रिया वाहतूक वितरण करून सर्व्ह केले जाते तेथे सुरक्षित, निरोगी आणि स्वच्छ अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे
  •  फूड ऑपरेशनसाठी परवाने आणि परवानगी देणे ते अधिकृत असल्यास योग्य किंवा नाकारणे
  •  लोकांसाठी पुरेसा सुरक्षित आणि आरोग्यदायी निवास सुनिश्चित करण्यासाठी घरांची नियमित तपासणी करणे
  • मनोरंजनात्मक जलतरण तलावांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या समस्या टाळता येतील अशा प्रकारे त्याची रचना आणि देखभाल करणे
  • मानवी आरोग्य सुरक्षा आणि सार्वजनिक कल्याणाच्या संरक्षणासाठी विद्यमान फेमवर्क आणि अटीनुसार निरीक्षण करून रेकॉर्ड तयार करणे
  • महानगरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्याकडून साफसफाईची कामे करवून घेणे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची पाहणी करून अहवाल देणे.
  •  घनकचरा कमी होण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करणे.
  •  अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि उघडय़ावर मलमूत्र विसर्जन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे.
  •  सांडपाणी व्यवस्थापन करणे.
  •  सार्वजनिक आरोग्य / साथीचे रोग यासंबंधी स्वच्छता निरीक्षक जनजागृतीचं काम करतो. पथनाटय़ाच्या प्रसंगी चित्रफितीच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीसमोर सभा घेऊन किंवा मोठय़ा शहरांमध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अधिकाधिक लोकांमध्ये प्रबोधन करणे.
  •  स्वच्छता निरीक्षकांनी मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करून कारवाई करावी.

कोर्स माध्यम

मराठी/इंग्रजी

कालावधी

1 वर्षे



आपला प्रवेश लगेचच निश्चित करा

अतिशय महत्वाच्या आणी मागणी असलेल्या यशस्वी वैद्यकीय करियरला सुरुवात करा

✯आमची ठळक वैशिष्टे✯

  • शासन मान्यता प्राप्त कौर्सेस

  • कौशल्यपूर्ण प्रशिक्षण

  • सरकारी तथा प्रायवेट सेक्टरमध्ये नोकरीची सुसंधी

  • चांगली रोजगाराची संधी

  • १००% सुसज्य प्रॅक्टिकल लॅब,आधुनिक यंत्रसामग्री,प्रशस्त सर्व सुविधायुक्त कॉलेज इमारत.

  • २०-२५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कॉलेजचे प्राचार्य व चेअरमन, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंध

  • माध्यम-मराठी/हिन्दी/English/अहिराणी

  • प्रमाणपत्राचा उपयोग संपूर्ण देशात सेवायोजन कार्यालयात नोंदणी करण्यासाठी,नोकरी मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • १००%प्रात्यक्षिके व मार्गदर्शन,नवीन बदलासह नवीन कोर्सेस.

  • सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व विविध क्षेत्रातील तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन

  • बस स्टँड पासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर कॉलेज

  • कोर्स पूर्ण झाल्यावर संस्थेकडून नोकरीसाठी १००% मार्गदर्शन

प्रवेश मिळवण्यासाठी


 Whatsapp /Contact📞

Whatsapp Chat Support


College Location 

अभिनव फाऊंडेशन, चाळीसगाव रोड, भडगाव, जि.जळगाव, महाराष्ट्र -424105

Address